केज: कदमवाडीत भूमाफियांचा कहर; शिवसेनेची पोलीस अधीक्षकांना तक्रार!
Kaij, Beed | Nov 25, 2025 केज तालुक्यातील कदमवाडी येथील एका वृद्ध महिलेला तिच्या जमिनीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी मंगळवार दि 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता समाज माध्यमातून केला आहे.त्यांच्या म्हणण्यानुसार, केज पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि महसूल कर्मचारी काही भूमाफिया व्यक्तींच्या दबावाखाली काम करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. कुटुंबीयांनी दाखवलेल्या कागदपत्रांनुसार सदर जमिनीवर 2020 साली कोर्टाने स्टे दिलेला असतानाही 2023 मध्ये बोगस खरेदीखत तयार करण्यात