भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत आंदोलन – स्नेहल सोहनी
महाबोधी महाविहार मुक्त करण्याच्या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या, १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. आज मंगळवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी यांनी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बौद्ध अनुयायींना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.