खामगाव: शेंद्री शिवारातुन शेती साहित्य लंपास
खामगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
खामगाव तालुक्यातील शेंद्री शिवारातील शेतातुन अज्ञात चोरट्याने ११ स्प्रिंक्लर पाईप व ८ नोझल असा एकुण १५ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे.याबाबत प्रकाश गुलाबसिंग पवार यांनी खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार दिली की,शेंद्री शिवारातील शेतातुन अज्ञात चोरट्याने ११ स्प्रिंक्लर पाईप व ८ नोझल असा एकुण १५ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला.या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा .