नगर: माजी सैनिकांचे पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप
त्रिदल संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन
माजी सैनिकाला एमआयडीसी पोलीस ठाण्यातून वारंवार फोन येत असून तेथील सहायक पोलीस निरीक्षकाकडून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी येत असल्याचा आरोप माजी सैनिकांनी केला आहे. याबाबत त्रिदल माजी सैनिक संघटनेच्या वतीने पोलीस अपर अधीक्षक वैभव कलबुर्गे यांना निवेदन देण्यात आले.