– स्वारगेट येथील हिराबाग चौकात दुपारी साडे दोनच्या सुमारास झालेल्या अपघातात आरिबा अरशदअल्ली कुरेशी (२४, रा. न्यु मोदीखाना कॅम्प) या तरुणीचा मृत्यू झाला. अरशद अल्ली अख्तरअल्ली कुरेशी (५५) यांच्या ताब्यातील टेम्पोने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बेफिकिरीने व भरधाव वेगात मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात आरिबा गंभीर जखमी झाली असून उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. चालकावर गुन्हा नोंद झाला असून त्याला अद्याप अटक नाही.