रामटेक: गांधी चौक रामटेक येथे 'रन फॉर मॅरेथॉन' स्पर्धेचे आयोजन
Ramtek, Nagpur | Nov 9, 2025 विश्व हिंदू परिषद, बजरंग दल रामटेक प्रखंड तालुका द्वारा नशा मुक्ती युवा फॉर विकसित भारत रन फॉर हेल्थ मॅरेथॉन स्पर्धा रविवार दिनांक 9 नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता च्या दरम्यान गांधी चौक रामटेक येथे आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आली. यात गट क्रमांक एक मध्ये पंधरा वर्षावरील महिला पुरुष स्पर्धक होते. तर गट क्रमांक दोन मध्ये पंधरा वर्षा खालील स्पर्धक सहभागी झाले होते. विजेत्यांना प्रमाणपत्र व पुरस्कार देण्यात आले.