धामणगाव रेल्वे: मोहम्मद पुरा रेल्वे स्टेशन येथे रेल्वेने कटून इसमाचा मृत्यू ;परिसरात हळहळ
धामणगाव रेल्वे– स्थानिक रेल्वे स्टेशनवर आज सकाळी झालेल्या दुर्दैवी घटनेत एका इसमाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला आहे. मृत इसमाचे नाव विनोद जोगी (वय ५३ वर्षे, रा. धावणेवाडी, धामणगाव रेल्वे) असे असून, ते भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले तसेच आई-वडील असा परिवार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हावडा–कुर्ला एक्सप्रेस रेल्वे गाडीखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत