किरकोळ कारणावरून वाद,३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल छत्रपती संभाजी नगर शहरातील वाळूज परिसरामध्ये असलेल्या साहिल ऑटो टेक्नॉलॉजी कंपनी समोर दोन मित्रांमध्ये वाद झाला. ढकलून दिल्याने गंभीर जखमी झालेल्या मित्राचा घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे