अमरावती: अमरावती येथे भाजप अमरावती महानगर कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती
अमरावती येथे भाजप महानगर कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा आज संपन्न झाला. यावेळी राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने मेहनत घेण्याचे आवाहन यावेळी मंत्री बावनकुळे यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, खा. डॉ. अनिल बोंडे, आ. संजय कुटेजी, मा. आ. प्रवीण पोटे पाटील शहराध्यक्ष नितीन धांडे आदींची उपस्थिती होती.