विक्रमगड: मुंबई विभागीय शालेय बेसबॉल स्पर्धा पालघर शहरातील स.तू.कदम विद्यालय प्रांगणात संपन्न
पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने मुंबई विभागीय शालेय बेसबॉल स्पर्धेचे पालघर शहरातील सतू कदम विद्यालय प्रांगणात आयोजन करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. विभागीय स्पर्धेदरम्यान मुंबई विभागाच्या 13 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला 19 आणि 17 वर्ष वयोगटात स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेतील विजेते संघ महाराष्ट्र राज्य स्पर्धे करिता मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.