सातपूर भागातील बारमध्ये गोळीबार प्रकरणी फरार असलेल्या लोंढे टोळीचा मोरक्या भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यास नेपाळ सीमेवरून गुन्हेशाखा युनिट दोनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल ऑरा बार येथे गोळीबार केल्यानंतर लोंढे टोळीचा मुख्य सूत्रधार भूषण प्रकाश लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. दोघांना आज पहाटेच्या दरम्यान नेपाळ सीमेवर पकडण्यात आले आहे.