तुमसर: देव्हाडी येथे विविध ५ दुकानात धाडसी चोरी, अज्ञात आरोपी विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल
तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे विविध 5 दुकानात धाडसी चोरी झाल्याची घटना आज दि. 12 नोव्हेंबर रोज बुधवारला सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यातील नानू मसरके, किसन सोनेवाने,राजेश नेवारे व विजू कतुरे अशी दुकान मालकांची नावे असून ते आपली दुकाने बंद करून घरी गेले असता अज्ञात आरोपींनी दुकानांचे शटर तोडून दुकानातील मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी घटनेचा अधिक तपास तुमसर पोलीस करीत असून अज्ञात आरोपी विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.