नागपूर शहर: नागपुरात थरार! वृंदावन कॉलनीत वन्यजीव रक्षक शुभम जीआर यांनी वाचविले कुटुंबाचे प्राण ; सहा फुटी विषारी कोब्राला दिले जीव
वृंदावन कॉलनी येथे सुप्रसिद्ध सर्पमित्र शुभम जीआर यांनी विषारी कोब्रा पासून कुटुंबांचे प्राण वाचविले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेले सात ते आठ दिवसापासून या कॉलनीतील रहिवाशांना एका घरातून दुसऱ्या घरात जाताना एक साप दिसत होता ज्यामुळे या कॉलनीमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते हा थरार तेव्हा शिगेला पोहोचला जेव्हा एका घरातील स्टोर रूममध्ये अचानक सापाचा आवाज येऊ लागला. पाहिले असता तेथे तब्बल सहा फूट विषारी कोब्रा आढळून आला.