सेलू: तीन दिवसांत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू – सेलू शहरात शोककळा
Seloo, Wardha | Nov 22, 2025 शहरातील वार्ड क्र. ४ मधील डुकरे कुटुंबावर अवघ्या तीन दिवसांत दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एकामागोमाग तिघांच्या मृत्यूने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. ही घटना १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान घडली असून मृतांमध्ये तुषार डुकरे (वय ३१), अंजनाबाई डुकरे (वय ८५) आणि माला डुकरे (वय ६१) यांचा समावेश आहे.