धामणगाव रेल्वे: वाघोली शेत शिवार येथे सोयाबीन काढायला गेलेल्या कासारखेड येथील तरुणाला विषारी परड सापाने घेतला चावा
विक्रम सोनवणे या तरुणाची घटना.कासारखेड ता. धामणगाव रेल्वे येथील विक्रम सोनवणे या 19 वर्षीय तरुणाला सकाळच्या सुमारास वाघोली शेतशिवारात सोयाबीन काढणी करत असताना विषारी परड सापाने चावा घेतल्याची घटना घडली.चावा घेतल्यानंतर तात्काळ ग्रामस्थांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. तेथे प्रथमोपचार देण्यात आल्यानंतर परिस्थिती लक्षात घेता डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील रुग्णालयात रेफर केले.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, ग्रामीण भागात काळजी घेणे आवश्यक आहे