कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी मध्यम प्रकल्प तसेच कालवे, शिकलेना व इतर अनुषंगिक कामांचा एकूण 21 कोटी 60 लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांचा उद्घाटन सोहळा आमदार संजना जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला.या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतीपर्यंत पाण्याचा पुरवठा सुलभ आणि नियमित होईल. दीर्घकाळापासूनची पाण्याची समस्या आता मार्गी लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.