पालघर: नारळाच्या झाडाला नालासोपारा येथे लागली आग
एका नारळाच्या झाडाला अचानक आग लागल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. एका मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी स्काय शॉट फटाका लावला असता फुटलेल्या फटाक्याची ठिणगी नारळाच्या झाडात पडल्याने नारळाच्या झाडाला अचानक आग लागली आणि झाडाने पेट घेतला. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.