अलिबाग: वकिलांचा लाल फिती लावून निषेध — जिल्हा न्यायालय अलिबागात आंदोलन
Alibag, Raigad | Nov 3, 2025 आज जिल्हा न्यायालय, अलिबाग येथे वकिलांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लाल फिती लावून शांततेत निषेध नोंदवला. बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या आवाहनानुसार हा निषेध आयोजित करण्यात आला होता.या आंदोलनात रायगड जिल्ह्यातील विविध न्यायालयांतील वकिलांनी सहभाग नोंदवला. वकिलांनी नियमित न्यायालयीन कामकाज पार पाडत असतानाच लाल फिती लावून शासनाने अॅडव्होकेट्स प्रोटेक्शन अॅक्ट तातडीने मंजूर करण्यात यावा या मुख्य मागणी साठी निदर्शने केली