हवेली: पिंपळे गुरव येथे तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक
Haveli, Pune | Nov 7, 2025 पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या एका गुंडाला सांगवी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. ही कारवाई मंगळवारी (4) नोव्हेंबर) दुपारी डायनासोर गार्डन जवळ पिंपळे गुरव येथे करण्यात आली.अक्षय दशरथ शिंदे (23, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शैलेश मगर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.