नाशिकरोड रेल्वे स्थानकावर एका अनोळखी व्यक्तीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना दिनांक 28 नोव्हेंबर रोजी घडली असून रात्री नऊ वाजता नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 29 नोव्हेंबर रोजी रेल्वे उपस्टेशन प्रबंधक नाशिकरोडचे आकाश भारद्वाज यांनी नाशिकरोड पोलिसांना दिलेल्या खबरीनुसार एका अनोळखी व्यक्तीचा नाशिकरोड रूळावर रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. अद्याप सदर इसमाची ओळख समजू शकलेली नसून पोलीस हवालदार सानप याप्रकरणी पुढील तपास करीत आहे.