कुही: पोलीस स्टेशन कूही हद्दीतील दारू विक्रेता एक वर्षकरिता कारागृहात स्थानबद्ध
Kuhi, Nagpur | Nov 29, 2025 पोलीस स्टेशन कूही हद्दीतील एका दारु विक्रेत्याला एक वर्ष साठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आल्याची घटना 28 नोव्हेंबर शुक्रवार ला दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. सदर आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन कूही येथे विविध कलमा नुसार गुन्हे दाखल असल्याने त्याच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी नागपूर यांच्या आदेशानुसार सदर आरोपीस एक वर्षा साठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.