औंढा नागनाथ: देवाळा पाटी जवळ स्कार्पिओ जीप पलटी एकाचा मृत्यू;जीपचे ३ लाखाचे नुकसान चालकावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औंढा नागनाथ ते हिंगोली मार्गावर औंढा नागनाथ तालुक्यातील देवळा पाटील जवळ अचानक नीलगाय समोर आल्याने चालकाचा स्कार्पिओ जीप वरील ताबा सुटून स्कार्पिओ रस्त्यालगत पलटी झाली यात आठ जण गंभीर जखमी झाले यातील गंभीर जखमी शशांक गाडे चा उपचारादरम्यान नांदेड येथे निधन झाले त्याच्या मृत्यूस इतराना दुखापत करण्यात तसेच जीपचे तीन लाखाचे नुकसान केल्याप्रकरणी अजय थोरात यांच्या फिर्यादीवरून जीप चालकावर १६ सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी साडेतीन वाजता औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला