नाशिक: मोबाईल चोर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात : तब्बल 14 मोबाईल जप्त
Nashik, Nashik | Nov 24, 2025 नाशिक रोडवर जनशताब्दी एक्स्प्रेसमधील मोबाईल चोरी प्रकरणात रेल्वे पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपी संतोष उर्फ प्रवीण रघुनाथ काळे (४०) याला अटक केली. नुकत्याच झालेल्या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल १४ मोबाईल फोन जप्त केले असून, त्यांची एकूण किंमत २ लाख १८ हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. नाशिक रोड येथील चित्रा निकम यांचा मोबाईल चोरीच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.