तिरोडा: गोरेगाव येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मा. सौ. चित्राताई वाघ यांची प्रचारसभा संपन्न
Tirora, Gondia | Nov 27, 2025 गोरेगाव नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मा. सौ. चित्राताई वाघ यांची जाहीर प्रचारसभा गोरेगाव येथे उत्साहात संपन्न झाली. या प्रचार सभेला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महिला शक्तीची भक्कम उपस्थिती आणि विजयाच्या निर्धाराने भरलेले वातावरण पाहून गोरेगावमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार याची खात्री अधिक दृढ झाली आहे.