कोपरगाव येथील गोदावरी नदीपात्रावरील छोट्या पुलाचे संरक्षण कठडे तुटले असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. सरंक्षण कठडे तुटल्यामुळे कुठलीही दुर्घटना घडू शकते. नगरपरिषद प्रशासनाने याबाबत लक्ष घालावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडु असा इशारा आज दिनांक ५ डिसेंबर रोजी दुपारी २ वा. सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांनी दिला आहे.