हिंगणघाट: भाजपच्या उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ नयना तुळसकर यांना मेष्टाने पाठिंबा:आ.कुणावार यांना दिले पत्र
हिंगणघाट:महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन म्हणजेच मेष्टा या संघटनेने आमदार समिरभाऊ कुणावार यांचे कार्यशैलीने प्रभावित होऊन येत्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपा उमेदवारांना आपला भक्कम पाठिंबा जाहीर केला आहे. नागपूर विभागाचे उपाध्यक्ष जयंत भोयर यांनी एका पत्राद्वारे आपले समर्थन जाहीर केले.आज मेष्टाचे पदाधिकारी तसेच सदस्यांना विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन येत्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपा उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.