गोडाऊनचा पत्रा वाकून दोन लाख चार हजारांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना आडगाव शिवारात घडली असून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रशांत अशोक देवरे राहणार अमृतधाम यांचे आडगाव शिवारातील शिवनगर सिद्धिविनायक चौक रोडवर, छत्रपती एंटरप्राइजेस व जय रोड लाईन्स नावाची ट्रान्सपोर्टचे गोडाऊन आहे.या गोडाऊनचा अज्ञात चोरट्यांनी पत्रा उचकावून मुद्देमाल चोरून नेला.