विक्रमगड: आमदार विलास तरे यांच्या उपस्थितीत चहाडे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ
चहाडे येथे आमदार विलास तरे आणि पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यक्षमता वाढवून लोकाभिमुख प्रशासन अधिक सक्षम करणे आणि गावोगावी शाश्वत विकास साधणे या उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले आहे. या याप्रसंगी सरपंच विष्णू जाधव, ग्रामपंचायत अधिकारी लता चौधरी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, सहाय्यक गटविकास अधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.