मोर्शी: वीर संभाजीराजे मित्र मंडळ यांचे वतीने, विचोरी येथे शंकर पटाचे आयोजन. आमदार राजेश वानखडे यांनी दिली भेट
वीर संभाजी राजे मित्र मंडळाच्या वतीने विचोरी येथे भव्य शंकर पटाचे आयोजन करण्यात आले असून, आज दिनांक 9 नोव्हेंबरला दुपारी एक वाजता तिवसा मतदार संघाचे आमदार राजेश वानखडे, यांनी या आयोजनाला भेट देऊन शंकर पटात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धक शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून शेतकरी आपल्या बैलांना घेऊन या शंकरपटात सहभागी झाले असून आकर्षक रकमेच्या बक्षिसाचे नियोजन देखील या ठिकाणी करण्यात आले आहे. यावेळी अनेक मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते