गोंदिया: गोंदिया पोलीस अधीक्षक कार्यालयात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ
पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे १ डिसेंबर रोजी नोव्हेंबर २०२५ महिन्यात नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी व मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक हितेश तिडके, पोलीस हवालदार कृष्णकुमार मिश्रा व वरिष्ठ श्रेणी लिपीक राधिका मडावी यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, रोपटे, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र