अयोध्या येथील सुलतानपूरजवळ शनिवारी 6 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात जळगाव शहरातील पिंप्राळा येथील एका ५५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, २५ ते ३० भाविक जखमी झाले आहेत.