परळी: विकासाच्या मुद्द्यावर जनता मतदान करणार जातीपातीला थारा नाही, धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांनी परळीत व्यक्त
Parli, Beed | Nov 28, 2025 परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासाच्या मुद्द्यालाच मत दिले जाणार असून जाती-पातीच्या राजकारणाला जनता थारा देणार नाही, असा ठाम विश्वास आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांनी व्यक्त केला आहे. परळीत माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या जनतेचा कौल स्पष्टपणे महायुतीच्या बाजूने दिसून येत आहे. राजश्री मुंडे म्हणाल्या की, परळीत धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी जनता विकासाचा मार्गच निवडेल.