सडक अर्जुनी: परसटोला येथे समाज प्रबोधन मेळावा व आदिवासी गोंडी पारंपारिक नृत्य स्पर्धा संपन्न
परसटोला येथील महामानव क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा स्मारक समितीच्या वतीने आयोजित समाज प्रबोधन मेळावा व आदिवासी गोंडी पारंपारिक नृत्य स्पर्धा घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे, पंचायत समिती सदस्य फुलचंद बागडेरिया, सरपंच रामू कुंभरे, लक्ष्मीकांत मडावी, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त नगरसेविका शीला उईके आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.