नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज शहरात उत्साहपूर्ण आणि शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर नागरिकांची हजेरी लावली.आमदार प्रताप अडसड यांनी सहकुटुंब मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवला. मतदानानंतर ते म्हणाले, “मतदान करणे हे आपले कर्तव्य आणि लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. धामणगाव रेल्वे शहराच्या सर्वांगिण विकासासाठी तसेच भारतीय लोकशाही समृद्ध करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे अत्यावश्यक आहे. आजचा दिवस पुढील ५ वर्षांचे भवितव्य ठरविणारा आहे.