कारंजा: न.प निवडणूक 🗳️
प्रचाराचा अधिकृत नारळ फुटताच एम.आय.एम पार्टीची कॉर्नर मिटिंग.माजी आमदार वारिस पठाण उपस्थित.
Karanja, Washim | Nov 26, 2025 Live.. आज २६ नॉव्हेंबर २०२५ बुधवार रोजी, न.प निवडणूकचे प्रचाराची अधिकृत सुरुवात झाली असून कारंजा येथे एम.आय.एम पार्टी व्दारा कॉर्नर सभा संध्याकाळी ८ वाजे पुंजाणी कॉम्प्लेक्स येथे ठेवण्यात आली होती. या बैठकीत प्रमुख वक्ते म्हणून एम.आय.एम पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार श्री.वारिस पठाण प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद युसूफ पुंजाणी व इतर न.प निवडणूक सदस्य पदाचे एम.आय.एम पार्टीचे सदस्य, पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.