तालुक्यातील नेटकेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक काम करीत असताना मागितलेली माहीती देत नाही. मी सांगेन तीच कामे करावी लागतील, अन्यथा तुला काम करु देणार नाही, असे म्हणत नेटकेवाडी गावठाणात असलेली शासकीय जमीन माझ्या नावावर करुन दे असे म्हणत ग्रामसेवकाच्या दिशेने खुर्ची फेकत कामकाजाचे रजिस्टर फाडण्याची घटना घडली. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात ग्रामसेवक अंकुश सुर्यभान मुळे यांच्या तक्रारीवरुन कानिफनाथ गहिनीनाथ धांडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.