हवेली: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर, चिंचवड येथे कार्यक्रम संपन्न
Haveli, Pune | Nov 11, 2025 १२८ जागांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ४ सदस्यीय पद्धतीने होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी ३२ प्रभाग आहेत. तर, नगरसेवक संख्या १२८ जागा असून यामध्ये ६४ महिला आणि ६४ पुरूषांसाठी जागा राखीव आहेत. त्यात अनुसूचित जाती (एससी) १० पुरुष १० महिला अशा २० जागा, अनुसूचित जमाती (एसटी) २ महिला १ पुरुष अशा ३ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग (बीसीसी, ओबीसी साठी) १७ महिला १७ पुरुष अशा ३४ जागा आणि खुल्या गटासाठी ३५ महिला ३६ पुरुष अशा ७१ जागा अशी वर्गवारी आहे.