कराड: साताऱ्यात भाजपचा राजकीय भूकंप लवकरच; महायुतीसह लढविण्याची तयारी पूर्ण : आ. डॉ. अतुलबाबा भोसले
Karad, Satara | Nov 1, 2025 सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष आता विरोधकांना फक्त धक्के देणार नाही, तर राजकीय भूकंप घडविण्याच्या तयारीत आहे. हा भूकंप लवकरच अनुभवायला मिळणार असून त्याची सर्व तयारी पूर्णत्वाकडे गेली असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली. त्यांनी शनिवारी सायंकाळी पाच वाजता पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमार्फत लढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः महायुतीसाठी आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले.