कोरेगाव: कोरेगावच्या कोंडीत मंत्री अडकले; ऊस ट्रॉलींनी ठप्प शहर; रिंगरोडशिवाय पर्याय नाही : शिवेंद्रसिंहराजे भोसले
कोरेगाव शहरातील ऊस वाहतुकीमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी आता अशा टप्प्यावर पोहोचली आहे की, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनासुद्धा या कोंडीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागला. शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अकलूजहून साताऱ्याकडे जाणाऱ्या त्यांच्या ताफ्याला आझाद चौक, डी.के.ऑईल मिल परिसरात वाहतुकीच्या रांगा भेटल्या आणि ताफा काही काळ ठप्प झाला. रस्त्यावर ट्रॉलींची गर्दी इतकी होती की, वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अक्षरशः धावाधाव करावी लागली.