चाकूर: हळद लागण्याआधीच काळाने घेतला चापोलीत नवरदेवाचा जीव,लग्नाच्या तयारीत मग्न असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विजेचा धक्का
Chakur, Latur | Nov 11, 2025 चाकूर -चापोली ग्रामपंचायतीचा मेहनती कर्मचारी सूर्यकांत व्यंकटी भिसे (वय ३५) याला लग्नाच्या काहीच दिवसांआधी काळाने ग्रासले. गावातील वीज दिवा दुरुस्ती करताना त्याला विद्युत खांबावर विजेचा तीव्र धक्का आज सकाळी 11 वाजन्याच्या दरम्यान बसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने चापोली गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान नवरदेवाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता.