अलिबाग: पुंडलिक पाटील यांनी खासदार सुनील तटकरे यांची घेतली भेट
Alibag, Raigad | Nov 11, 2025 आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा बांधकाम, अर्थ व नियोजन सभापती पुंडलिक (बंधू) पाटील आणि शिवसेना कर्जत विधानसभा संघटक पंकज पुंडलिक पाटील यांनी खासदार सुनील तटकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृतरीत्या प्रवेश करणार असल्याची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांच्या प्रवेशाचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या आगमनाने पक्षसंघटन अधिक बळकट होईल, असा मला विश्वास आहे. या प्रसंगी रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे तसेच, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.