विमाननगर येथील पीएनजी ज्वेलर्समध्ये बनावट अंगठी ठेवून हातचलाखीने एक लाखांची सोन्याची अंगठी चोरणाऱ्या सैफ दिलीप बेळगावकर (वय 29, रा. वानवडी) याला विमानतळ पोलीसांनी बेड्या ठोकल्या. आरोपी औंध येथील शाखेतही अशीच चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडून चोरीस गेलेली अंगठी हस्तगत करण्यात आली असून त्याने अनेक सराफ व्यावसायिकांना फसवल्याची शक्य