कन्नड: 'तुमचं घर नावावर होऊ देणार नाही' : कन्नडमध्ये चक्क उमेदवारांचं थेट मतदारांना आव्हान करणारा व्हिडिओ व्हायरल
कन्नड नगरपरिषद निवडणुकीत मतदान प्रक्रिया पार पडून तब्बल 76.83 टक्के मतदान नोंदवले गेले आहे.दरम्यान सोशल मीडियावर शिवसेनेच्या एका उमेदवाराचा वादग्रस्त व्हिडिओ आज दि 3 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेपासून प्रचंड व्हायरल होत आहे.व्हिडिओमध्ये संबंधित उमेदवार म्हणताना दिसत आहे, “धनुष्यबाणला मतदान करा, नाही तर तुमचं घर नावावर होऊ देणार नाही.”या वक्तव्यामुळे मतदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.