नरखेड: विवरा येथील शेतातील विहिरीत पडला बिबट्या ; पिंजऱ्यात कोंबडी टाकून वनविभागाने केले सुरक्षित रेस्क्यू, बघा व्हिडिओ
Narkhed, Nagpur | Nov 24, 2025 विवरा येथील शेतकरी ज्ञानेश्वरी चौधरी यांच्या शेतातील विहिरीत अचानक बिबट्या पडला. शिकारीच्या शोधात हा बिबट्या आला आणि नंतर विहिरीत पडला असावा. घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली. त्या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. दरम्यान वनविभागाने शक्कल लढविली आणि एका पिंजऱ्यामध्ये कोंबडी टाकून त्या बिबट्याला सुरक्षित रेस्क्यू केले. व विहिरीतून सुखरूप बाहेर काढून नागपूर येथे पाठविण्यात आले.