पुणे जिल्ह्यातील १२ नगर परिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी मंगळवारी (दि. २) झालेल्या निवडणुकीत सरासरी ६८ टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता निवडणूक शांततेत पार पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आता ३ डिसेंबरऐवजी २१ डिसेंबर रोजी होणार असल्याने पुढील १९ दिवस जिल्हा प्रशासनाला मतपेट्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी लागणार आहे.