यवतमाळ: चिखली कॅम्प येथे लाखो रुपयांच्या गांजाची शेती करणारा पोलिसांच्या ताब्यात
पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चिखली कॅम्प येथे एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गांजाची लागवड केली आणि तो स्वतः या गांजाची रखवाली करीत असल्याची गुप्त माहिती पुसद उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकत 84 किलो 900 ग्राम गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत 12 लाख 73 हजार 500 रुपये इतकी आहेत.