पुणे शहर: कोंढव्यात जुन्या वैमनस्यातून तरुणावर धारदार हत्याराने हल्ला.
कोंढवा खुर्द येथे जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. भैरवनाथ मंदिरामागील सर्व्हे क्र. ३५४ परिसरात ६ डिसेंबर रोजी रात्री १२.४५ च्या सुमारास आरोपी तरुण व त्याचे तीन अनोळखी साथीदार यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर धारदार हत्याराने डोक्यावर, पाठीवर व डाव्या कोपरावर वार करून फिर्यादीस गंभीर जखमी केले. कोंढवा पोलिसांनी भा.दं.वि. कलम १०९, ११५