नागपूर शहर: टास्क फ्रॉड करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर नागपूर सायबर पोलिसांचा पोखरण ॲक्शन ; फिल्मी स्टाईलने केली अटक
सायबर क्राईमच्या माध्यमातून 'टास्क फ्रॉड' करून नागरिकांना गंडा घालणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा नागपूर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यातील मुख्य आरोपींचा माग काढत नागपूर सायबर टीमने थेट राजस्थानच्या पोखरण येथे धडक दिली आणि एका आरोपीला अटक केली.सायबर पोलीस स्टेशन, नागपूर येथे दाखल असलेल्या एका सॉफ्टवेअर डेव्हलपरची टास्क फ्रॉडच्या माध्यमातून एकूण २,३१,५०० ची फसवणूक झाली होती.