राजूरा: ग्रामपंचायत बामणवाडाला तहसील कार्यलयात महा आवास अभियान २०२४-२५ अंतर्गत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार
राजुरा तालुक्यातील बामणवाडा ग्रामपंचायतीने महा आवास अभियान २०२४-२५ अंतर्गत उल्लेखनीय कार्य करून संपूर्ण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. "सर्वोत्तम ग्रामपंचायत" या श्रेणीत बामणवाडा ग्रामपंचायतीचा गौरव तहसील कार्यलयात सेवा पंधरवडा कार्यक्रमानिमित्ताने आज दि १७ सप्टेंबर ला १२ वाजता आयोजित कार्यक्रमात करण्यात आला आहे.