एक वायरल होत असलेला व्हिडिओ हाती आलेला आहे,शहरातील टेका नाका ते इंदोरा चौक दरम्यान काही तरुणांचा एक समूह अत्यंत धोकादायक पद्धतीने दुचाकी चालवताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एका जागृत नागरिकाने रेकॉर्ड केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक मोपेड ओव्हरलोड केलेली आहे, तर एका तरुणाला दुसऱ्या तरुणाच्या मांडीवर बसवून ही जीवघेणी राईड सुरू होती.